केस गळणे
- Marvel Skin, Hair and Laser Clinic
- Jun 14, 2022
- 2 min read
केस गळणे
केस गळण्याची कारणे व उपचार हे समझण्यासाठी, केसांचा चक्र समजणे महत्वाचे आहे . साधारणतः माणसाच्या डोक्यावर १००००० केस असतात, म्हणूनच एका दिवसात ५० ते १०० केस गळणे हे नॉर्मल आहे. प्रत्येक केस हे एका वेळेला वेगळ्या टप्प्यात असते.
१)ऍनाजेन - हे केस वाढण्याचा टप्पा आहे. हे २-७ वर्षापर्यंत चालतो. डोक्यावरील ९०% केस हे ऍनाजेन मध्ये असतात.
केस गळण्याची विविध कारणे :
ताणतणाव , मधुमेह , उच्चं रक्तदाब, लठ्ठपणा , इन्सुलिन प्रतिरोध, PCOD , रक्तपातळी कमी होणे, अशक्तपणा,थायरॉईड ग्रंथीचे हार्मोन्स कमी असणे,व्हिटॅमिन्स ची कमतरता,झिंक,प्रोटीन लोह ची कमतरता, डाएटिंग ,दीर्घकालीन आजार, दीर्घकालीन औषधे घेणे,गर्भधारणा,आनुवंशिक, हार्मोन्स चे बदल,शारीरिक ताण,पर्यावरणातील प्रदूषण , पुरुष पद्धतीत केस गळणे, वय वाढणे , अँटिडिप्रेसंट गोळ्या घेणे, स्वयंप्रतिकारामुळे केस गळणे, कीटकनाशके , अनबॉलिक स्टिरॉइड्स,प्रेसेर्व टिव्हसचा जास्त वापर, धूम्रपान ,अल्कोहोल,
केस पुन्हा जगवता यावे ह्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.
१) केसांच्या मुळांना पुरेश्या प्रमाणात केसांची संतुलित पोषक तत्वे पुरवणे. अर्थात केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे. ह्यात भाज्या,फळ, दूध, दही, ताक, मोळ आलेली मटकी, मूग,काकडी, गाजर, बीट , कळधान्ये आणि डाळी भरपूर प्रमाणात घ्या.
टाळण्याच्या पदार्थामध्ये साखरेचे पदार्थ, बॅकेरीतील पदार्थ, फास्ट फूड, चाइनीस फूड,शेंगदाना , नारळ ,तळलेले पदार्थ हे कमीत कमी वापरावे किंवा पूर्णपणे बंद करावे.
नियमित व्यायाम करणे,चालणे , योग इत्यादी .
पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी करणे.
केस गळण्याच्या समस्येसाठी काही औषधोपचार ज्यामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, व अँटिऑक्सिडंट्स ची संतुलित मात्र आहे अशे घेण्यास सांगितले जातात. ही पोषक तत्वे त्वचे साठी व सामान्य आरोग्यासाठी देखील हितकर असतात.
२)रक्तामध्ये DHT (हार्मोन्स) ची पातळी योग्य ठेवणे.
ह्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे आणि नियमित व्यायाम करने महत्वाचे आहेत.
जेव्हा केसांचे anagen (वृद्धी अवस्था) कमी होते आणि टेलोजेन (गळण्याची अवस्था) जास्त होते तेव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त होतात. ट्रीटमेंट केल्यानी हि अवस्था पालटवते .
पुरुष किंवा महिला पद्धतीचे केस गळणे ह्यामध्ये नॉर्मल केस हा बारीक होतो आणि शेवटी मुळासकट नष्ट होतो. हि प्रक्रिया रक्तामधल्या काही पदार्थामुळे सुरु झालेली असते त्यामुळे केसांची ट्रीटमेंट
केल्यास हि प्रक्रिया slow होते व केस हे जास्त काळा पर्यंत टिकवून ठेऊ शकतो.
केसांची ट्रीटमेंट हि 6-8 महिने सलग घेतले पाहिजे व नंतर मैण्टिनन्स केले पाहिजे.उपचार सुरु केल्यानंतर २-४ महिन्यामध्ये ह्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागतात.

Kommentare