त्वचेवरील बुरशी चा आजार (गजकर्ण)
- Marvel Skin, Hair and Laser Clinic
- May 25, 2022
- 1 min read
बुरशीचा संसर्ग झाल्यास घ्यावयाची काळजी
सैल व सुती कपडे घालावेत.
ओलसर अंतर्वस्त्र घालू नयेत. घट्ट जीन्स, लेगिंग घालणे टाळावे.
अंतर्वस्त्र उलटे करून साबणाने धुवावे व कडक उन्हामधे वाळवावेत किंवा इस्त्री करून घ्यावेत.
कामानंतर, प्रवासानंतर घाम अंगामध्ये मुरून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी दोन वेळा अंघोळ करणे व घाम येणाऱ्या जागा धुणे आवश्यक आहे.
आपले कपडे इतरांना वापरण्यास देवू नयेत. प्रत्येकाचा टॉवेल, साबण वेगळा असावा.
केस, नखे यांची नियमीत निगा राखावी. वजन वाढल्याने घाम जास्त येतो म्हणून व्यायाम करावा. शुगर च्या रुग्णाना दिर्घ कालावधी साठी उपचार घ्यावा लागतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी भाजीपाला, फळांनी युक्त आहार घ्यावा.
त्वचारोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मलमांचा वापर करावा. प्यानडर्म, बेटनोवेट, फोरडर्म, क्लोबेट जी असे अनेक मलम तात्पुरती खाज कमी करतात परंतु ते त्वचेसाठी घातक आहेत.
बुरशी संसर्गाचा उपचार त्रास कमी वाटला म्हणून डॉक्टरांना विचारल्याशिवाय बंद करू नये.
अजून माहिती साठी - https://youtu.be/eWDLBUebyXo

Comments